ठाणे : कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमध्ये ठाणे शहरातील सुमारे 75 हजार रिक्षा चालकांचा व्यवसाय बंद आहे. या रिक्षा चालकांना काहींनी मदत केली. पण अद्यापही रिक्षाचालक स्थिरस्थावर होऊ शकलेला नाही. त्यामुळे ठाणे शहर रिक्षा - टॅक्सी चालक मालक कृती समितीच्या वतीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना निवेदन दिले आहे. या निवेदनाद्वारे या रिक्षा चालकांसाठी मदतीचा हात पुढे करावा , अशी मागणी करण्यात आली आहे.
आजच्या घडीला दैनंदिन उत्पन्न असलेल्या रिक्षाचालक, घोडागाडी चालक, फेरीवाले, सलूनमध्ये काम करणारे कारागीर अशा अनेकांसमोर रोजगाराचा प्रश्न उपस्थित झाला आहे. अनेकांच्या हातातील रोजगार गेला. त्यामुळे जगायचे कसे, खायचे काय? असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. ठाण्यातील रिक्षा चालकांचीही आता हीच अवस्था झाली आहे. रिक्षा दारात उभ्या आहेत, त्यांचे हप्ते फेडायचे आहेत, घरच्यांना दोन वेळचा घास द्यायचा आहे, हे सर्व कसे करायचे? अशा पेचात रिक्षाचालक सापडला आहे. शहरात आजच्या घडीला 75 हजारांच्या आसपास रिक्षा चालक आहेत. त्यांच्यावर अवलंबून सुमारे तीन लाख नागरिक आहेत. या सर्वांचे पोट आता कसे भरायचे ? असा प्रश्न या रिक्षाचालकांसमोर आहे.
महत्वाची बातमी : आजपासून सुरु झालेल्या स्पेशल ट्रेनचं वेळापत्रक खास तुमच्यासाठी..
मधल्या काळात काही दानशूर व्यक्तींनी रिक्षाचालकांना मदत केली खरी, मात्र ती देखील अपुरी पडली आहे. त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्र्यांना एक निवेदन दिले असून या निवेदनाद्वारे रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी काही कल्याणकारी योजना राबवावी, अशी मागणी केली आहे. तसेच आर्थिक मदतही करण्यात यावी अशी मागणीही करण्यात आली आहे.
lockdown on rickshaw drivers, Ask Chief Minister Uddhav Thackeray for help
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.